कांदा भावात घसरण; मक्याचे भाव वाढले

By Admin | Updated: April 30, 2017 01:32 IST2017-04-30T01:32:01+5:302017-04-30T01:32:11+5:30

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात मात्र घसरण सुरुच असल्याचे दिसून आले.

Onion falling; Maize prices have increased | कांदा भावात घसरण; मक्याचे भाव वाढले

कांदा भावात घसरण; मक्याचे भाव वाढले

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात मात्र घसरण सुरुच असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत व परदेशात सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ४०३१२ क्विंटल झाली उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु . २०० ते ५८० सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते.
उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १३५४६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु . १५० कमाल ५५५ तर सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते. सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक १७४ क्विंटल झाली बाजारभाव किमान रु . १५५०कमाल १७७९ तर सरासरी १६८१ रुयांपर्यंत होते. सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली . बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले.बाजरीची एकुण आवक ५० क्विंटल झाली. भाव किमान रु . १२९६ कमाल रु १४५१ तर सरासरी १३४१ रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची आवक टिकून होती तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसुन आले. हरबऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने भाव तेजीत होते. हरभऱ्याची एकुण आवक ८९ क्विंटल झाली . भाव किमान ५४०१ कमाल ९१०० तर सरासरी ७१९१ रुपयांपर्यंत होते.
तुरीच्या आवकेत घट झाली तर भाव स्थिर असल्याचे दिसुन आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहील्याने भाव स्थिर होते. तुरीची एकुण आवक ३७ क्विंटल झाली. भाव किमान रु .३५०० कमाल ३९०९ तर सरासरी३७८५ रुपयांपर्यंत होते.
सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयाबीनला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सोयाबीनची एकुण आवक ५६ क्विंटल झाली. भाव किमान रु . २७४४ , कमाल २८३४ तर सरासरी २८०१ रुपयांपर्यंत होते.

Web Title: Onion falling; Maize prices have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.