कांदा निर्यातीत ४५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:22 IST2019-10-17T14:20:34+5:302019-10-17T14:22:01+5:30

लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी सकाळ सत्रात कांदा लिलावात बुधवारच्या तुलनेत कमाल दरात २३३ रु पयांची घसरण झाली. ...

 Onion exports decline by 5% | कांदा निर्यातीत ४५ टक्के घट

कांदा निर्यातीत ४५ टक्के घट

ठळक मुद्देदरात घसरण : खरेदीला मर्यादा आल्याने व्यापारीवर्गही नाराज

लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी सकाळ सत्रात कांदा लिलावात बुधवारच्या तुलनेत कमाल दरात २३३ रु पयांची घसरण झाली. प्रतिक्विंटल २९११ रूपये हा सर्वाधिक भाव जाहीर झाला. दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाचे आकडेवारी नुसार आता यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत पंचेचाळीस टक्के कांदा निर्यातीत घट आहे. त्याचा फटका देशाच्या परिकय चलनावर होत आहे. कांदा साठवणुकीवर निर्बंधांचे कारणाने व निर्यात बंदीमुळे व्यापारी वर्गात सत्तारूढ सरकार विरोधी नाराजी निर्माण झाली आहे. कांदा खरेदीनंतर सरकारने कधी अचानक कांदा खळ्यावर तपासणी केली तर कारवाईचा बडगा नको म्हणून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी खरेदीत फारसा रस दाखवित नाही त्यामुळे कांदा आवक कमी असली की भावात तेजी येत, भाव वाढतात असा नेहमीच आलेला अनुभव आहे. परंतु कांदा निर्यातबंदीमुळे आता परदेशी सौदे नाहीत. त्यामुळे प्रथम क्रमांकाच्या भावावर परिणाम होत आहे. तसेच देशातल्या दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक चांगली आहे. त्यामुळे तेथे देखील मागणी फारसी नाही. कांदा खरेदी करून ठेवला तर कारवाईची भिती आहे. त्यामुळे व्यापारी बाजारपेठेत कोणताही धोका पत्करायला तयार नाही. व्यापारी वर्गाचे आस्थापनेवर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आहेत. त्यांचा वेतनाचा खर्च मोठा आहे. परंतु कांदा निर्यात बंदी व कांदा साठवणुकीवर निर्बंधांचे निर्णयामुळे साठाही करता येत नाही. क्र यशक्ती व खरेदीची मोठी आर्थिक कुवत असतांनाही व व्यापारास चांगली संधी असतांनाही व्यापार करता येत नाही .त्यामुळे कांदा खरेदीदार व्यापारी नाराज आहेतच, त्यामुळे आता शेतकरीच नव्हे तर व्यापारी देखील नाराज आहेत. बुधवारी कांदा आवक १४३५ क्विंटल होती व भाव उन्हाळ कांदा किमान १२०१ ते कमाल ३१५४ रूपये ते सरासरी २८०१ रूपये होता.

Web Title:  Onion exports decline by 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक