रेल्वेद्वारे बांगलादेशला कांदा निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:44 IST2020-05-07T23:44:38+5:302020-05-07T23:44:45+5:30
नाशिकरोड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड महिन्यापासून कांदा निर्यात बंद होती. भुसावळ मंडळातील लासलगाव, निफाड, खेरवाडी या रेल्वेस्थानकांवरून बांगलादेश येथे कांदा निर्यात करण्यात आला आहे. पहिल्या मालगाडी ४२ वॅगनचा रॅक बुधवारी लासलगावपासून व ४२ वॅगनचे दोन रॅक गुरु वारी निफाड व खेरवाडी येथून रवाना करण्यात आले. तीनही रॅकमधून ५१०० टन कांदा निर्यात करण्यात आला आहे.

लॉकडाउनमुळे गेल्या दि.२२ मार्चपासून कांदा निर्यात बंद होती. रेल्वे प्रशासनाने आता रेल्वेमार्फत विविध वस्तू, शेतीमाल निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी ४२ वॅगनचा रॅक लासलगाव येथून बांगलादेशच्या दरशनापर्यंत पाठविण्यात आला. तर गुरु वारी ४२ वॅगनचे २ रॅक निफाड आणि खेरवाडी स्थानकावरून दरशना स्थानकापर्यंत रवाना करण्यात आले.
द्राक्ष निर्यात करण्याचेही नियोजन
मध्य रेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक असे सर्व सहकार्य हे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना केले जात आहे. तसेच प्रशासनातर्फे व्यापाऱ्यांसाठी मालवाहतूक नियमामध्ये बदल करण्यात आले आहे. जेणेकरून व्यापाºयांना आपला माल पोचवण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यात करण्याचे नियोजन केले जात असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.