मुंढेगावजवळ कार अपघातात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:18 PM2019-10-18T16:18:22+5:302019-10-18T16:18:35+5:30

नांदूरवैद्य : नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि.१८) घडली.

 One was seriously injured in a car accident near Mundegaon | मुंढेगावजवळ कार अपघातात एक गंभीर जखमी

मुंढेगावजवळ कार अपघातात एक गंभीर जखमी

Next

नांदूरवैद्य : नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) घडली. जखमी व्यक्तीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ नाशिकहून मुंबईकडे एमएच ४३, एआर ८३६८ या क्रमांकाची कार भरधाव जात होती; मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आदळली. झालेल्या अपघातात कारचालक प्रदीप रावजी पटेल (३६, रा. मुंबई) गंभीर जखमी झाले असून, अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून जखमी युवकास नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहेत.
रु ग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणा
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड घटनास्थळी पोहोचताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस रु ग्णवाहिकेत टाकल्यानंतर उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्तीकडे रोख रक्कम नऊ हजार नऊशे रु पये व पंधरा ते वीस हजार किमतीचा मोबाइल तिथेच पडल्याचे रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी घटनास्थळाहून रक्कम व मोबाइल उचलून नेला. त्यानंतर जखमी व्यक्तीचे नातेवाईक आल्यानंतर सर्व रक्कम व मोबाइल प्रामाणिकपणे गुंड यांनी जखमींच्या नातेवाइकांकडे सोपविला.

Web Title:  One was seriously injured in a car accident near Mundegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक