शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एक हजार किलोमीटर्सची बाईक रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 12:53 AM

ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघातील विविध गावांमधून  सुमारे २५० दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. 

ठळक मुद्देआरटीओचा उपक्रम : चार महामार्गांवरील ४० गावांमध्ये पोहोचविला सुरक्षा संदेश

नाशिक : ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघातील विविध गावांमधून  सुमारे २५० दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून, प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये दिवसेंदिवस रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या पालनाविषयी वाढत चाललेली उदासीनता हे यामागील मुख्य कारण असल्याने यावर्षी नाशिक आरटीओकडून ग्रामीण भागात जनजागृती करण्याकरिता रविवारी (दि.७) ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १ हजार किलोमीटरच्या परिघात बाइक रॅली काढण्यात आली. सकाळी ८ वाजता पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सुरेंद्र निकम, ड्रायव्हिंग स्कीलचे असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.बाइक रॅलीने ग्रामीण जनतेचे लक्ष वेधून घेत रस्ते सुरक्षेचे नियम व अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबतची माहितीपुस्तिका व माहिती पत्रकांचे ठिकठिकाणी वाटप करण्यात आले. विविध जनप्रबोधनपर कार्यक्रमही घेण्यात आले.या बाइकर्स ग्रुपचा सहभागरॉयल हार्टेड, महिंद्र ए.आर.के.ऑटो, द रायडर्स ऑफ नाशिक, ग्रुझिंग गॉड‌्स ग्रुप, बाइकर्णी नाशिक ग्रुप, युनायटेड फिफ्टीनर्स, वाइनसिटी एचडी ग्रुप, मॅक्सरिस्ट या ग्रुपच्या दुचाकी रायडर्ससह विविध मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनचालकांनीही सहभाग नोंदविला.असा होता रॅलीचा मार्गn २५० दुचाकीस्वारांची चार प्रमुख मार्गांवर विभागणी करण्यात आली होती. n ओझर, पिंपळगाव, वडाळीभोई, चांदवड, मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण, दिंडोरी. n सायखेडा, निफाड, विंचूर, लासलगाव, येवला.n नाशिकरोड, शिंदे-पळसे, सिन्नर, वावी, नांदुरशिंगोटे.n गंगापूर, गिरणारे, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा