कन्नमवार पुलावरून एकाची आत्महत्त्या
By Admin | Updated: February 19, 2017 22:04 IST2017-02-19T22:04:16+5:302017-02-19T22:04:16+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना

कन्नमवार पुलावरून एकाची आत्महत्त्या
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ देवीदास किसनराव टेरे (४७, रा़ राजरत्ननगर, सिडको) असे आत्महत्त्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास टेरे यांनी कन्नमवार पुलावरून उडी घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये आत्महत्त्येस कोणासही जबाबदार धरू नये, असा उल्लेख आहे़ दरम्यान, कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्त्या केल्याचा पोलिसांचा कयास असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़