गोंदेफाटा ते रायगड नगर दरम्यान झालेल्या तीन अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 03:45 PM2020-10-11T15:45:53+5:302020-10-11T15:46:14+5:30

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

One person was killed and three others were seriously injured in three accidents between Gondephata and Raigad Nagar | गोंदेफाटा ते रायगड नगर दरम्यान झालेल्या तीन अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

गोंदेफाटा ते रायगड नगर दरम्यान झालेल्या तीन अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देकारचा चालक फरार असून वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील लियर कंपनीजवळ मोटसायकल क्र मांक (एम.एच. १५, एफ. झेड. ८२६३) या मोटरसायकलस्वाराचे गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे सदर मोटरसायकलस्वाराने समोरच असलेल्या दुभाजकावर जात जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार आकाश भगत (३०, रा. कांचनगाव इगतपुरी) हा तरु ण गंभीर जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त तरूणास नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर रायगड नगर येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात एका वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना घडली. यानंतर नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना रायगडनगरजवळ मोटरसायकल (एम.एच.०६, ए.वाय. ३९०) या मोटरसायकलला समोरून विरूध्द दिशेने भरधाव येत असलेल्या इंडिगो गाडीने (एम.एच. ०१, पी.ए.९०००) जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील अशोक कचरू घुगे (४५, नांदूरशिंगोटे), सविता अशोक घुगे (३०, नांदूरशिंगोटे) हे दांपत्यास गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.११) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना समजताच घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दोघांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. सदर कारचा चालक फरार असून वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.
(११नांदूरवैद्य)दुभाजकावर जात जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराची झालेली अवस्था.

Web Title: One person was killed and three others were seriously injured in three accidents between Gondephata and Raigad Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.