हरणाच्या मांसविक्री प्रकरणी आणखी एकास अटक
By Admin | Updated: August 29, 2015 00:01 IST2015-08-29T00:01:36+5:302015-08-29T00:01:53+5:30
हरणाच्या मांसविक्री प्रकरणी आणखी एकास अटक

हरणाच्या मांसविक्री प्रकरणी आणखी एकास अटक
आझादनगर : मालेगाव शहरात गुरुवारी घडलेल्या हरणाच्या मांसविक्री प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी एकास नाशिक येथून अटक केली. शुक्रवारी दोघा आरोपींना न्यायालयात आणले असता, त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस नाईक सतीश पाटील यांनी फिर्याद दिली.
मालेगावच्या हुडको भागात गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून हरणाचे सात किलो मांस जप्त केले होते. एकास अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नाशिकच्या वडाळा गावातून गुलाम मुस्तफा वली (५०) यास अटक केली. (प्रतिनिधी)