सायखेडा : निफाड तालुक्यातील सिन्नर-नांदूरमधमेश्वर रस्त्यावरील म्हाळसाकोरे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाला ओम्नी (क्रमांक-एमएच ०४ सीझेड २५९५) हे वाहन संशयास्पद आढळले. यावेळी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी मद्याच्या बाटल्या साधारणत: एक लाख तीन हजार रुपये किमतीची अवैध मद्य मिळाले. यावेळी संशयित वाहन चालक मंगेश विश्वनाथ माळी रा. नायगाव यास पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. वाय. श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक एस. आर. वाघचौरे, कॉन्स्टेबल के. आर. चौधरी, वाय. डी. साळवे आदिंनी केली आहे.
म्हाळसाकोरे शिवारात एक लाखाचे देशी-विदेशी मद्य जप्त, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:06 IST