सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावरील खोपडी शिवारात मंगळवारी (दि.११) सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी मनोरूग्ण ठार झाला. खोपडी परिसरात दोन महिन्यांपासून मनोरूग्ण रस्त्यावरील भंगार गोळा करीत मिळेल ते खाऊन गुजराण करीत होता. ग्रामस्थांनीही त्याला पाहिले होते. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जनार्दन गुरूळे यांनी डेअरीजवळ मनोरूग्णाच्या पायाला गंभीर जखम झाल्याच्या अवस्थेत आढळला. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्याला तत्काळ नगरपालिकेच्या दवाखान्यात नेले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. त्याने अंगात जर्किन, चौकटीचा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली आहे. पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनाच्या धडकेत मनोरूग्ण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:24 IST