भरवीर फाट्याजवळ वाहनाच्या धडकेने एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 23:06 IST2021-09-26T23:04:31+5:302021-09-26T23:06:13+5:30
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर भरवीर फाट्याजवळ मालेगाव ते नाशिक बाजूकडे जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने पन्नास वर्षीय इसमास पहाटेच्या वेळी धडक देऊन पळून गेल्याची खबर सोमा टोल कंपनीचे प्रकाश बच्छाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली.

भरवीर फाट्याजवळ वाहनाच्या धडकेने एक ठार
ठळक मुद्दे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर भरवीर फाट्याजवळ मालेगाव ते नाशिक बाजूकडे जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने पन्नास वर्षीय इसमास पहाटेच्या वेळी धडक देऊन पळून गेल्याची खबर सोमा टोल कंपनीचे प्रकाश बच्छाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली.
सदर इसमास सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून योगेश कोतवाल व सुरेश जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापू चव्हाण, निंबेकर करीत आहेत.