अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:23 IST2018-11-05T14:23:32+5:302018-11-05T14:23:54+5:30

सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावरील मिरगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली.

One killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावरील मिरगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. मिरगाव शिवारातील म्हस्के वस्तीजवळ रविवार (दि. ४) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सदरचा अपघात घडला. माधव म्हस्के (६५ रा. मिरगाव, ता. सिन्नर) असे मयताचे नाव आहे. म्हस्के घरी परतत असताना भरधाव येणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पी. के. अढांगळे तपास करत आहे.

Web Title: One killed in an unknown vehicle

टॅग्स :Nashikनाशिक