अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: May 15, 2014 16:38 IST2014-05-15T00:47:58+5:302014-05-15T16:38:30+5:30
नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना आडगाव स्मशानभूमीजवळ मंगळवारी घडली़ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आडगाव स्मशानभूमीजवळ सदर घटना घडली. भरधाव आलेल्या वाहनाने एकाला धडक दिली़ या अपघातात ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर वाहनचालक फरार झाला़ दरम्यान, या अपघात प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संबंधित भरधाव वेगाने वाहन हाकणार्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)