नांदूरशिंगोटे बायपासजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 18:48 IST2019-08-11T18:48:37+5:302019-08-11T18:48:48+5:30
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावालगत असणाऱ्या बायपासजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

नांदूरशिंगोटे बायपासजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावालगत असणाऱ्या बायपासजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
भास्कर केशव डेंगळे (६१) रा. निमगाव-जाळी ता. संगमनेर असे मृताचे नाव आहे. डेंगळे हे आपल्या दुचाकीने नाशिक येथे आपल्या मुलाकडे जात असताना सदरचा अपघात झाला असल्याचे पोलीसांनी सांगितले. नांदूरशिंगोटे बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या चौफुलीजवळ डेंगळे यांना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. विशेष म्हणजे डेंगळे यानी हेल्मेट परिधान केले होते. वावी पेलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार पी. के. अढांगळे हे तपास करीत आहे.