येवल्यात दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:39 IST2020-10-30T21:54:14+5:302020-10-31T00:39:17+5:30
येवला : शहरालगत येवला- कोपरगाव महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

येवल्यात दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी
येवला : शहरालगत येवला- कोपरगाव महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास येवल्याहून कोपरगावकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १५ जीके ३०२७) अज्ञात वाहनाने कट मारला. यात मोटारसायकल घसरून दुचाकीस्वार पंकज पंडित गायकवाड (२६, रा. जेऊरकुंभार, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), सुजीत भीमराव जाधव (२९, रा. शाहपंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक), प्रदीप दिलीप जाधव (२५, रा. शाहपंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे रोडवर पडले. तर यावेळी मागून आलेल्या ट्रकखाली चिरडल्या गेल्याने पंकज गायकवाड जागीच ठार झाले, तर सुजीत जाधव, प्रदीप जाधव हे गंभीर जखमी झाले. हा अपघात येवला - कोपरगाव महामार्गावर म्हसोबानजीक घडला. दुचाकीस्वार येवला येथे आलेले होते. परतताना अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार केले गेले. या प्रकरणी शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.