शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:25 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून एकाच आठवड्यात गोंदे दुमाला ते वाडिव-हे दरम्यान ...

ठळक मुद्देगोदे दुमाला परिसरात अपघातांची मालिका सुरूच

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून एकाच आठवड्यात गोंदे दुमाला ते वाडिव-हे दरम्यान झालेल्या अपघातात झालेल्या अपघातांत आत्तापर्यंत पाच जण ठार झाल्याच्या घटना ताजी असतांनाच मंगळवारी रात्री ९:३०च्या सुमारास कुऱ्हेगाव जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला.

दुसरी घटना नाशिक-मुंबई या महामार्गावर असलेल्या गोंदे दुमाला येथील लियर कंपनीजवळ घडली असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. गोंदे दुमालाहून अस्वलीकडे जात असतांना मोटारसायकल क्रमांक (नवीन गाडी नंबर नाही) या मोटारसायकलस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कुऱ्हेगाव येथे वळण घेत असतांना दुचाकीस्वार बाजूच्या असलेल्या शेतीत जवळपास २० फुट खोल असलेल्या ठिकाणी पडल्यामुळे या झालेल्या अपघातात राहुल कैलास सोनवणे (३०, रा.परधडी चाळीसगाव) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश सुभाष सोनवणे (२२, रा. रावळगाव मालेगाव) या जखमी झालेल्या तरुणावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना मोटरसायकल क्रमांक (एमएच १५, जीयू ५२३३) या दुचाकीस्वाराने समोरच उभ्या असलेल्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात चालक सुभाष बाबुराव चव्हाण (४७, रा.बेझे, त्र्यंबकेश्वर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या दोन्हीही अपघातांची माहिती मिळताच गोंदेफाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातातील जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता कुऱ्हेगावजवळील अपघातातील तरुणास उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन्हीही अपघातांचा पुढील तपास वाडिव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.कुऱ्हेगावजवळ झालेल्या अपघातात दुचाकीची झालेली अवस्था. (१० नांदूरवैद्य १)

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू