मालेगाव : तालुक्यातील वडनेर-नामपूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने द्याने येथील सौरव ऊर्फ सिद्धेश्वर गोपाळ कापडणीस (१४) हा मुलगा गंभीर जखमी होऊन ठार झाला.
गोपाळ दाजी कापडणीस (४०) रा.द्याने, ता.सटाणा यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी ट्रक (क्र. एमएच १८ बीए ०३८५) वरील चालक विठोबा ज्ञानेश्वर काळे (रा. जळगाव, ता. मालेगाव) याचेविरोेधात गुन्हा दाखल केला. आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून समोरून येणारी दुचाकी (क्र. एमएच १५ सीवाय ८८६७ )ला धडक दिली. यात फिर्यादी गोपाळ कापडणीस आणि पोपट कापडणीस जखमी झाले, तर सौरव ऊर्फ सिद्धेश्वर कापडणीस याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो ठार झाला. त्याच्या मरणास व दोघांच्या दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून ट्रकचालक विठोबा काळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.