वणी : वणी - दिंडोरी रस्त्यावरील कृष्णगाव येथील वनविभाग परिसराजवळ ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.या अपघातात दुचाकीवरील महिला व ट्रॅक्टरवरील मजूर जखमी झाला. चिंतामण सावळीराम गायकवाड (रा. म्हैसखडक, ता. सुरगाणा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. राधा वाघमारे व मजूर जगन भीमराव कडाळे हे जखमी झाले आहेत. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. वरखेडा येथून विटा घेऊन ट्रॅक्टर कृष्णगाव येथे जात होता. नंदू सूर्यवंशी असे ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.
ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:24 IST