तांगडी शिवारात अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:14 IST2018-03-26T00:14:30+5:302018-03-26T00:14:30+5:30

तांगडी शिवारात अपघातात एक ठार
चांदवड : चांदवड-देवळा रोडवर देवळ्याकडून लासलगावकडे येणारी रिक्षा क्रमांक एमएच १५ बीडब्ल्यू-५८७८ ही तांगडी शिवारात एका शेताजवळ रविवारी सकाळी ११ वाजता पलटी होऊन शिरीष दत्तात्रय साखरे (४२), रा. लासलगाव हा इसम जागीच ठार झाला. शिरीष ऊर्फ भाऊसाहेब साखरे हे लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच लासलगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे. वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सी. पी. गांगुर्डे करीत आहेत.