पंचवटी : पेठरोडला म्हसरूळ रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुचाकीवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.पेठरोड मनपा कमान जवळ हा अपघात घडला. या अपघातात जेलरोड येथील अंगद सुभाष जोशी ठार झाला. याबाबत मयत जोशी यांचे बंधू अभिषेक जोशी यांनी तक्र ार दाखल केली आहे. शनिवारी (दि.४) जोशी यांचा भाऊ अंगद व त्याचे मित्र नीलेश बेंडकुळे व भूषण असे तिघेजण दुचाकीवरून पेठरोडने नाशिक दिशेला येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तिघे खाली पडले, त्यात जोशी याला गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
पेठरोडला वाहनाच्या धडकेने एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:18 IST