शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमध्ये विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 08:48 IST

मालेगाव मध्य  शहरातील बोहरा कब्रस्तान समोर रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने एक ठार तर 12वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.

नाशिक - मालेगाव मध्य  शहरातील बोहरा कब्रस्तान समोर रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने एक ठार तर 12वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.जखमी मुलावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी (64)रा.गुलशेर नगर असे मृताचे नाव आहे.अधिक माहिती अशी की शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी हे चंदनपुरी गेट ते मरीमाता मंदिर रस्त्याने जात असताना बोहरा समाज कब्रस्तान समोर असलेल्या विद्युत खांबावरील विजवाहिनी तार तुटून पडली.तुटलेल्या तारेवर शकिल अहमद व मोहम्मद यासीन एकबाल अहमद (12)रा.हिरापुरा या दोघांचा पाय पडल्याने विजेचा धक्का बसला.यात मोहम्मद यासीन हा बाजुस फेकला गेल्याने बेशुद्ध पडला तर शकील अहमद यांनी खांबाचा आश्रय घेतला.मात्र खांबामध्येच विज प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने ते जागीच ठार झाले तर मोहम्मद यासीन हा बेशुद्ध पडला.नागरिकांनी दोघांना उपचारार्थसामान्य रुग्णालयात   दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शकिल अहमद यांना तपासुन दाखलपुर्व मयत घोषीत केले.महावितरणच्या दुरुस्ती विभागाच्या चालढकल कार्यपध्दतीमुळे शकील अहमद यांचा जीव गमावला असुन दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.यापुर्वीही शहरातील कमालपुरा येथे वीजवाहिनीची तार तुटून अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता.गत महिन्यात बापु गांधी नगर येथे खांबात वीजप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागुन शेळी गतप्राण झाली होती.विद्दुत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य माणसाला आपला जीव गमवावा लागतो आहे.त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक