पळसेजवळ एक ठार
By Admin | Updated: July 15, 2014 00:46 IST2014-07-14T23:52:52+5:302014-07-15T00:46:13+5:30
पळसेजवळ एक ठार

पळसेजवळ एक ठार
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गावाजवळ दुचाकीला अज्ञात इंडिका कारने दिलेल्या धडकेत चिंचोली फ ाटा येथील युवक जागीच ठार झाला़ नाशिक जुना कथडा, नानावली येथील तौसिक लुकमान पठाण हा चिंचोली फ ाटा येथे राहणाऱ्या आनंद बद्रीप्रसाद शर्मा (३०) याला घेण्यास गेला होता़ या दोघांसह शर्मा याची पत्नी सुनीता आनंद शर्मा व मुलगी काजल शर्मा (२) हे सर्व दुचाकीवरून पळसे येथून जात असताना नाशिकरोडहून सिन्नरकडे जाणारी पांढऱ्या रंगाची इंडिका कार पुढील एसटीबसला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारला़ यामध्ये दुचाकी घसरल्याने चौघेही खाली पडले़ त्यात आनंद शर्मा हा जागीच ठार झाला़ जखमी तौसिक पठाण, मयत आनंदची पत्नी सुनीता व दोन वर्षांची मुलगी काजल हे गंभीर जखमी झाले आहेत.