हॉटेलचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:55 IST2021-05-29T23:49:35+5:302021-05-29T23:55:12+5:30
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चाळीसगाव फाटा परिसरात हॉटेल एकताचा कोसळलेला स्लॅब.
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
रिमझिम पाऊस सुरू असताना जीर्ण झालेली ही इमारत कोसळली. या घटनेची माहिती अग्निशमन दल व तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल दोन-तीन तास मदतकार्य सुरू होते. मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. या घटनेत धुळे येथील मोहम्मद सलमान यांचा मृत्यू झाला आहे लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, घटनेनंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.