गिरणारे-वाघेरा रस्त्यावरील अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:04 IST2020-03-14T16:04:32+5:302020-03-14T16:04:50+5:30

त्र्यंबकेश्वर : गिरणारे-वाघेरा रस्त्यावर देवरगाव शिवारात गोपाळा मुंडे यांच्या शेतानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला. ...

One killed in Girnare-Waghera road accident | गिरणारे-वाघेरा रस्त्यावरील अपघातात एक ठार

गिरणारे-वाघेरा रस्त्यावरील अपघातात एक ठार

त्र्यंबकेश्वर : गिरणारे-वाघेरा रस्त्यावर देवरगाव शिवारात गोपाळा मुंडे यांच्या शेतानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला. गोरख सुका लिलके (रा. महादेवनगर, ता.त्र्यंबकेश्वर) हा दुचाकीवरून (क्र . एमएच १५ डीव्ही १७५४) हरसूलहून नाशिककडे जात असताना समोन येणाऱ्या रामभाऊ बंडू भाडमुखे यांच्या दुचाकीला (क्र.१५ इडब्ल्यू ६३५९) धडक दिली. यात भाडमुखे यांच्या मागे बसलेले शिवराम नाना कर्पे (वय ६५) गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. दोन्हीही दुचाकीचालक जखमी झाले असून, दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत रामभाऊ बंडू भाडमुखे यांनी हरसूल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, हवालदार बाळासाहेब राऊत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One killed in Girnare-Waghera road accident

टॅग्स :Accidentअपघात