कार अपघातात एक ठार

By Admin | Updated: March 18, 2017 23:12 IST2017-03-18T23:12:20+5:302017-03-18T23:12:50+5:30

द्याने : वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने झाडाला धडक देत पलट्या घेतल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

One killed in car accident | कार अपघातात एक ठार

कार अपघातात एक ठार

 द्याने : वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने झाडाला धडक देत पलट्या घेतल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
मालेगाव येथील छायाचित्रकार कामानिमित्त पिंपळनेर येथे गेले होते. काम आटोपून मालेगावच्या दिशेने परतीच्या प्रवासात असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास द्याने गावाजवळील अपघाती वळणावर चालकाचा कारवरील (एमएच ४१, व्ही ७३३२) ताबा सुटल्यामुळे कारने झाडाला धडक देऊन कार खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जाजूवाडी येथील भूषण बापुराव अहिरे (३५) जागीच ठार झाले, तर यशवंत बाजीराव देवरे (४०), किशोर बाबूराव दाभाडे (३९) व अंबादास देवीदास जगताप (३५, सर्व रा. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच नामपूर येथील स्नेहराज सावंत, अशोक चौधरी, राकेश सूर्यवंशी, सुनील खैरनार, बाळा कापडणीस, हिंमत अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मोराणकर यांनी उपचार करून मालेगाव येथे हलविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम कोळी, बापू फंगाळ यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: One killed in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.