शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

त्र्यंबकरोडवर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:06 IST

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. या अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले आहे़

नाशिक : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. या अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले आहे़ अशोकनगर येथील तुषार भाऊसाहेब शिंदे (२०) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे़ त्याच्यासोबत असलेले गोलू ऊर्फ सौरभ उपेंद्र सिंग (२२) आणि बागलाणचा दत्तात्रय गायकवाड हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तुषार शिंदे व त्याचे मित्र हे रविवारी (दि.१६) रात्री बाराच्या सुमारास नाशिकहून सातपूरच्या दिशेने एमएच १५ एफवाय ६४७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून ट्रीपलसीट जात होते. रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्यामुळे तुषारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला़महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंगदेवळाली कॅम्प : लॅमरोड भाटीया महाविद्यालयाबाहेर अल्पवयीन विद्यार्थिनीला दमबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॅमरोड भाटीया महाविद्यालयाबाहेर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी उभी असताना संशयित आशिष शेवाळे हा तिच्याकडे येऊन तू माझ्याशी बोल असा दम देत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपनगरला गॉगल विके्रत्यास मारहाणनाशिकरोड : उपनगर नाका येथील गॉगल विक्रेत्याने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघा जणांनी विक्रेत्यास मारहाण करून त्याच्या स्टॉलची मोडतोड केली. मखमलाबाद कोळीवाडा येथील सिवान समीर पटेल (२२) हा युवक उपनगर नाका येथे गॉगल विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी दुपारी संशयित सचिन भडांगे, किरण भडांगे, लखन पवार यांनी गॉगल विक्रेता सिवान याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सिवान याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण करून धारदार हत्याराने जखमी केले.कारच्या धडकेनेवृद्धाचा मृत्यूनाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील श्री घंटी म्हसोबा मंदिरासमोर कारने दुचाकीसह वयोवृद्धास धडक दिल्याने या अपघातात बाळकृष्ण कथ्थू जोशी (७५) रा. रत्नदीप रोहाउस, जयभवानीरोड यांचा मृत्यू झाला़ भरधाव वेगात जाणारी आयटेन कार (एमएच १५, इबी ६५९४)ने धडक दिल्याने मोटारसायकल (एमएच १५, इ १०५२) ला देखील धडक दिल्याने विशाल भाऊसाहेब वाघ रा. चेहेडी हादेखील जखमी झाला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी