पांगरीनजीक अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:25 IST2020-06-11T22:29:25+5:302020-06-12T00:25:38+5:30
पांगरी : शिवारातील बाबास धाब्याजवळ मालवाहू ट्रकने समोरून मोटारसायकला धडक दिल्याने कोपरगाव तालुक्यातील तरुण ठार झाला. सिन्नरकडून येणारी पल्सर मोटारसायकल (एमएच १५ डीएच २२९३) व शिर्डीकडून येणारा आयशर ट्रक (एमएच ४८ एजी २५२१) यांच्यात हा अपघात झाला.

पांगरीनजीक अपघातात एक ठार
पांगरी : शिवारातील बाबास धाब्याजवळ मालवाहू ट्रकने समोरून मोटारसायकला धडक दिल्याने कोपरगाव तालुक्यातील तरुण ठार झाला.
सिन्नरकडून येणारी पल्सर मोटारसायकल (एमएच १५ डीएच २२९३) व शिर्डीकडून येणारा आयशर ट्रक (एमएच ४८ एजी २५२१) यांच्यात हा अपघात झाला. मयत दुचाकीस्वार सुयोग कैलास वाकचौरे (१८), वारी शिंगवे ता. कोपरगाव) येथील असून, पुढील उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. ट्रक निमोण, ता. संगमनेर येथील आहे. वावी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला.
अपघात प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवालदार संदीप शिंदे व सदगीर तपास करीत आहेत.