नांदूरशिंगोटे बायपासजवळ अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:59 IST2018-03-18T01:59:40+5:302018-03-18T01:59:40+5:30

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपासजवळील मानोरी चौफुलीवर बस व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 One killed in an accident near Nandurshingoet Bypass | नांदूरशिंगोटे बायपासजवळ अपघातात एक ठार

नांदूरशिंगोटे बायपासजवळ अपघातात एक ठार

ठळक मुद्देशवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपासजवळील मानोरी चौफुलीवर बस व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश लक्ष्मण लोहकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारात बायपासजवळ मानोरी चौफुलीवर नाशिककडे जाणारी शिवशाही बस (क्र. एमएच ०९ इएम १२८३) जात असताना मानोरी रस्त्याने नांदूरशिंगोटे गावाकडे आठवडे बाजारासाठी मानोरी येथील पंढरीनाथ मारुती कोरडे (६०) हे बजाज एमएटी मोटारसायकल (क्र. एमएच १७ जे २८७२) येत होती. त्यावेळी बस व दुचाकी यांच्यात चौफुलीवर समोरासमोर अपघात झाला.
अपघातात बसची धडक बसल्याने कोरडे गंभीररीत्या जखमी झाले होते. नाशिक येथे उपचारासाठी त्यांना हलविण्यात आले होते. रस्त्यातच त्यांचे निधन झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title:  One killed in an accident near Nandurshingoet Bypass