खोपडी शिवारात अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 13:31 IST2019-03-20T13:31:10+5:302019-03-20T13:31:17+5:30

सिन्नर : टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुधाच्या टॅँकरवर शिर्डीकडे जाणारा आयशर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर आयशरचालक गंभीर जखमी झाला.

One killed in accident in Khopdi Shivar One injured | खोपडी शिवारात अपघातात एक ठार; एक जखमी

खोपडी शिवारात अपघातात एक ठार; एक जखमी

सिन्नर : टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुधाच्या टॅँकरवर शिर्डीकडे जाणारा आयशर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर आयशरचालक गंभीर जखमी झाला. सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात हॉटेल रिच समोर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सदरचा अपघात घडला. अपघातात राजेशकुमार (वय ३९, रा. कळोद्रा, जि. बांदा उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. खोपडी शिवारातील रिच हॉटेलसमोर टायर फुटल्याने टॅँकर रस्त्याच्या बाजूला उभा होता. भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातात आयशर ट्रकचा चालक मोहम्मद शकील हसन हा गंभीर जखमी झाला आहे. वावी पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One killed in accident in Khopdi Shivar One injured

टॅग्स :Nashikनाशिक