अपघातात एक ठार
By Admin | Updated: December 27, 2015 23:17 IST2015-12-27T23:11:34+5:302015-12-27T23:17:13+5:30
सहा जखमी : चिखलओहोळ शिवारातील घटना

अपघातात एक ठार
आझादनगर : मालेगाव येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चिखलओहोळ शिवारातील एकता हॉटेलसमोर इनोव्हा कार पलटी होवून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला असून कार चालकासह सहा जण जखमी झाले. जखमींवर मालेगावी खासगी रूग्णालयात उपचार सुरू झालेत. घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
याबाबत तालुका पोलिसात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. चमणनगरातील तरुण जुबैर नावाच्या मित्राच्या लग्नास जळगाव जवळील पालधी येथे जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजता इनोव्हा क्र. एमएच ४१ व्ही ३९७४ निघाले होते. मालेगाव शहरापासून अवघ्या १0 कि.मी.अंतरावर एकता हॉटेल येथे ओव्हरटेक करीत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळून पलटी झाली. झालेल्या अपघातात शेख जुबैर शेख निसार अहमद (१८) रा. चमननगर हा जागीच ठार झाला तर चालक वसीम अहमद सलीम अहमद (२६), अवैशखान शब्बीरखान (२0), मोहंमद अलीम फारूख अहमद (१९), शेख इरफान शेख सलाउद्दीन (१९), शेख सलमान शेख रियाजुद्दीन (२0) व अलीम शेख सर्व रा. चमननगर हे जखमी झाले.
अपघाताची माहिती कळताच काँग्रेस गटनेते हाजी शेख खालीद, माजी नगरसेवक शकील अहमद यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली. जुबैर अहमद याच्या मृतदेहाचे सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून दुपारी दोन वाजता बडा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई व तीन भावंडे असा परिवार आहे. तालुका पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.