नाशिकरोडला गोळीबारात एक जखमी

By Admin | Updated: July 8, 2017 01:38 IST2017-07-08T01:38:10+5:302017-07-08T01:38:24+5:30

नाशिकरोड : येथील वडनेरगेट येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली.

One injured in firing in Nashik Road | नाशिकरोडला गोळीबारात एक जखमी

नाशिकरोडला गोळीबारात एक जखमी

नाशिकरोड : येथील वडनेरगेट येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली. आनंदनगर येथे राहणारे शिवमीलन रामराज सिंग (४२) हे आपल्या चारचाकी गाडीने शुक्रवारी मध्यरात्री पाथर्डी फाट्याकडून नाशिकरोडकडे येत होते. वडनेरगेट येथे अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडविली आणि गोळीबार केला. यावेळी सिंग यांच्या डाव्या हाताच्या पंजाला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Web Title: One injured in firing in Nashik Road