तोतयागिरीप्रकरणी एकास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 00:51 IST2022-02-17T00:51:07+5:302022-02-17T00:51:24+5:30
ओझर येथील एचएएल कंपनीच्या हद्दीत तोतयागिरी करणाऱ्या एकाला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी अजून एकास ताब्यात घेतले आहे.

तोतयागिरीप्रकरणी एकास पोलीस कोठडी
ओझर : येथील एचएएल कंपनीच्या हद्दीत तोतयागिरी करणाऱ्या एकाला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी अजून एकास ताब्यात घेतले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रासारखेच बनावट ओळखपत्र बाळगून सुरक्षिततेला बाधा पोहोचवेल, असे कृत्य केल्याबद्दल गुन्हे शोध पथकाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, मनोज पटेल उर्फ अबू हसन सलीम पठाण (३७) राहणार सारडा सर्कल यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, अधिक तपासात अजून एक संशयित आरोपी ओझर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पालघर येथील आरोपी फरार असून, त्याचा शोध ओझर पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येत आहे. दरम्यान, एका आरोपीला सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले असल्याची माहिती ओझर पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.