शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

येवल्यात आरोग्य यंत्रणेलाच झाली कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:57 IST

येवला : कोरोना विषाणू संसर्गाने येथील आरोग्य यंत्रणाच बाधित झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाने गवंडगाव, पाटोदा, अंगणगाव या ग्रामीण भागातील गावांमध्ये शिरकाव केला.

योगेंद्र वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोना विषाणूसंसर्गाने येथील आरोग्य यंत्रणाच बाधित झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाने गवंडगाव, पाटोदा, अंगणगाव या ग्रामीण भागातील गावांमध्ये शिरकाव केला. या तीनही गावात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.एकाच दिवसाच्या या१६ बाधितांमुळे येवला तालुक्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २५वर गेला आहे. विशेष म्हणजे या २५मध्ये १३ बाधित आरोग्य यंत्रणेशी संबंधित असून, एक पोलीस कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. येवल्यातील एकूण १०८ स्वॅब नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ४८ अहवाल प्राप्त झाले असून ३१ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.अद्याप ६० अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, एकूण ७९ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, १९१ व्यक्तींना होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, परिचारिका कोरोनाबाधित सिद्ध झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व संबंधित होम क्वॉरण्टाइन झाले होते, तर रुग्णालय कामकाज चालविण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली गेली होती.-------------------अंदरसूल : गावाजवळ गवंडगाव येथे कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्याने अंदरसूलकरांमध्ये खळबळ उडाली आहे. येवला शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अंदरसूल ग्रामस्थांनी आज सकाळपासून पूर्ण गाव कडकडीत बंद ठेवला आहे. गावातील व्यापारी पेठेतील सर्व किराणा दुकान बंद असून, भाजीपाला विक्र ीदेखील बंद होती. गावातील सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.---------------------------ग्रामीण भागही झाला सजगयेवला शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता ग्रामीण भागही सजग झाला आहे. लगतच्या गावांनी गावबंदी करत गाव प्रवेशाचे प्रमुख रस्ते बंद केले आहेत. याबरोबरच जनजागृतीवर भर दिला जात असून, सरपंच, पोलीसपाटील जातीने गावात लक्ष ठेवून आहेत. अनेक गावांनी सलग तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, कठोर उपाययोजनांवर भर दिला जात आहे.--------------------पाटोद्यात कठोर उपाययोजनापाटोदा : येथेही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने गावात कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. गाव शंभर टक्के बंद असून, गावात प्रवेशाचे प्रमुख मार्गही बंद केल्या गेले आहेत. पाटोदा येथे रुग्ण आढळून आल्याने लगतच्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. लगतच्या गावांनीही आपल्या गावसीमा बंद केल्या आहेत. पिंपळगाव लेपचा पाटोदा गावांशी नजीकचा संपर्क असल्याने ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून प्रमुख रस्ते बंद केले आहेत. उद्यापासून सलग तीन दिवस गाव शंभर टक्के बंद ठेवले जाणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक