एक तास झाडांसाठी... पर्यावरणाच्या रक्षणासाठी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:02 IST2019-12-29T23:01:59+5:302019-12-29T23:02:28+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक तास झाडांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ...

एक तास झाडांसाठी उपक्र मात सहभागी झालेले रासेयोचे स्वयंसेवक.
पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक तास झाडांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी वेळेचा सदुपयोग करीत विविध उपक्रम राबविण्यात आले.
दर रविवारी एनएसएसचे स्वयंसेवक महाविद्यालय आणि शहरातील विविध परिसरात एक तास झाडांसाठी देतात. त्यात झाडांना आळे करणे, माती, पाणी टाकणे, झाडांभोवती साफसफाई करणे, वृक्षारोपण आदी कामांच्या माध्यमातून श्रमदान केले जाते. या उपक्रमात काही नागरिक व सामाजिक तरुण मंडळांनीदेखील यात सहभागी होऊन श्रमदान करीत आहेत.
निसर्ग वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावण्याची गरज आहे. आमच्या महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून नवा उपक्रम राबवित आहोत. आम्ही प्रत्येक रविवारी एक तास झाडांसाठी देत असून, सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. त्यामुळे आपला वर्तमानकाळ सुखकर होऊन पुढच्या पिढीलाही झाडांचे संगोपन करण्याचा आदर्श देता येईल.
- प्रा. ज्ञानोबा ढगे, पिंपळगाव महाविद्यालय
आॅक्सिजन, सावली, अन्न, फुले, पान, औषध, फळे, लाकूड, मध, डिंक, लाख, कागद, लेखणी आदी वृक्षांपासून मिळतात. आपली उपजीविका झाडांवर अवलंबून आहे. यामुळे वृक्षलागवड आणि त्यांचे जतन केले तरच पर्यावरणाशी आपले नाते दृढ होईल. यामुळेच रविवारचा एक तास झाडांसाठी हा उपक्र म पूर्ण आम्ही राबावित असून, राज्यातील इतर शाळा, महाविद्यालयातही याबाबत जागृती करीत आहोत.
- मोहन मोरे, स्वयंसेवक, रासेयो
हा उपक्र म आम्हाला खूप छान वाटतो. प्रत्येक रविवारी आम्हाला झाडांना एक तास वेळ देता येतो. यासाठी आम्हाला जास्त श्रम घ्यावे लागत नाही व झाडांना पाणी देऊन त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होते. त्यामुळे हा उपक्र म इतर शाळा, महाविद्यालयांनीही राबवावा व पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे. - सपना दवंगे, स्वयंसेवक, रासेयो