दुभाजकावर दुचाकी आदळून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:11 IST2018-06-19T01:11:48+5:302018-06-19T01:11:48+5:30

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आनंदवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ नहुश कैलास कडलग (२२, रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, आनंदवली, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़

 One dies of a pair of bikes and dies of one | दुभाजकावर दुचाकी आदळून एकाचा मृत्यू

दुभाजकावर दुचाकी आदळून एकाचा मृत्यू

नाशिक : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आनंदवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ नहुश कैलास कडलग (२२, रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, आनंदवली, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कडलग व त्याचा मित्र संकेत सुधाकर भालेराव (२६, रा. फ्लॅट नंबर ७, एमआयजी, उपेंद्रनगरसमोर, अंबड लिंकरोड) हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नवीन केटीएम दुचाकीने सिटी सेंटर मॉलकडून एबीबी सर्कलकडे येत होते़ एबीबी सर्कलजवळील मिल अ‍ॅण्ड व्हील्स हॉटेलसमोरील वळणावर त्यांची भरधाव दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली़ यामध्ये नऊश कडलग याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर त्याच्या पाठीमागे बसलेला संकेत भालेराव हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर श्री गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ एबीबी सर्कलजवळ दुभाजकावर आदळून अपघात होण्याचे महिन्यातील दुसरी घटना आहे.
या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचालक कडलग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  One dies of a pair of bikes and dies of one

टॅग्स :Accidentअपघात