वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:52 IST2020-08-04T21:55:01+5:302020-08-05T00:52:21+5:30
चांदवड : तालुक्यातील वडगावपंगू शिवारात चालत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला.

वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
ठळक मुद्दे चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील वडगावपंगू शिवारात चालत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला.
पुष्पक एक्स्प्रेसमधून रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अनारसिंग शंकरलाल (३८, जलालपूर, जौरा, मध्य प्रदेश) हा भुसावळकडे प्रवास करीत असताना चालत्या रेल्वेतून पडून मरण पावल्याची खबर समीट रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर कार्तिक चव्हाण यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास ए. आर. पवार करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.