चांदवडला आशा सेविकांचा एकदिवसीय संप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:26+5:302021-09-25T04:14:26+5:30
या निवेदनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा सेविका, गटप्रवर्तक यांना न्याय मिळावा, सर्वांना आघाडीच्या फळीतील कर्मचारी संबोधून तातडीने कोरोना लस ...

चांदवडला आशा सेविकांचा एकदिवसीय संप !
या निवेदनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा सेविका, गटप्रवर्तक यांना न्याय मिळावा, सर्वांना आघाडीच्या फळीतील कर्मचारी संबोधून तातडीने कोरोना लस द्यावी, सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवावीत, सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोणत्याही कारणाने मृत्यू आल्यास पन्नास लाखांचा विमा लागू करावा, मासिक दहा हजार रुपये जोखीम भत्ता मिळावा, कोविड बाधा झाल्यास दहा लाखांची नुकसानभरपाई द्यावी, कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी सुवर्णा सोनवणे, सुनीता जाधव, रूपाली आहेर, कावेरी गांगुर्डे, माया रकिबे, तमन्ना शेख, सदक सैय्यद, अंजली बनकर, अनिता बनकर, संगीता क्षत्रीय, दीपाली पारवे, वैशाली ठाकरे, सपना जंगम, वंदना कोतवाल, सुवर्णा जाधव, मोहिनी पवार, सीमा बागुल, जयश्री सोनवणो, संगीता अहिरे, संगीता कोठावदे, यमुना पवार, आदींसह आशासेविका उपस्थित होत्या. -