शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:36 IST2019-11-08T23:13:41+5:302019-11-09T00:36:05+5:30
जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देताना निलेश सागर, भागवत डोईफोडे, कुंदन सोनवणे, अरुण अंतुर्लीकर, अरविंद नरसीकर, तहसीलदार अरविंद दौंडे, नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल, दिनेश वाघ, गणेश लिलके, एन.वाय. उगले, बी.व्ही. खेडकर आदी.
नाशिक : जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकºयांप्रति महसूल कर्मचारी हे कामयच संवेदनशील राहिलेले आहेत. शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून नाशिक जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना व तलाठी संघ यांनी, एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १५०० अधिकारी व कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना करण्यात आली आहे.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, उपजिल्हाधिकारी अरुण अंतुर्लीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार अरविंद दौंडे, संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल, दिनेश वाघ, गणेश लिलके, एन.वाय. उगले, बी.व्ही. खेडकर, संजय गाडे, सोमनाथ खैरे, डी.बी. केसरे, नितीन मेधणे आदी उपस्थित होते.