खोपडी येथील चोरीप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:44 IST2018-11-28T17:44:21+5:302018-11-28T17:44:37+5:30

सिन्नर : तालुक्यातील खोपडी खुर्द शिवारातून लोखंडी जाळी व अ‍ॅँगल असा सुमारे साडेसतरा हजार रूपयांचा ऐवज चोरणाऱ्या खंबाळे येथील एकाला वावी पोलिसांनी अटक केली आहे.

One arrested for theft in Khopdi | खोपडी येथील चोरीप्रकरणी एकास अटक

खोपडी येथील चोरीप्रकरणी एकास अटक

सिन्नर : तालुक्यातील खोपडी खुर्द शिवारातून लोखंडी जाळी व अ‍ॅँगल असा सुमारे साडेसतरा हजार रूपयांचा ऐवज चोरणाऱ्या खंबाळे येथील एकाला वावी पोलिसांनी अटक केली आहे.
खोपडी शिवारातील पंडीत बाबुराव दराडे यांच्या शेतातून विविध साहित्याची चोरी झाली होती. साहित्यात शेतीसाठी वापरण्यात येणाºया लोखंडी तारा व अ‍ॅँगल असा एकुण साडेसतरा हजार रूपयांचा माल चोरीस गेला होता. संशयावरून वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी खंबाळे येथील राहुल भाऊसाहेब खाडे यास मुद्देमालासह अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. जे. मोरे तपास करीत आहेत.

Web Title: One arrested for theft in Khopdi