One arrested with a pistol | पिस्तूलसह एकास अटक

पिस्तूलसह एकास अटक

ठळक मुद्देआझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली, नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीर-रीत्या अग्निशस्र (पिस्तूल) बाळगताना मिळून आला. त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते यांनी काल शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास १५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल बाळगताना ताब्यात घेतले.मालेगावी विशेष पोलीस पथकाने पिस्तूलसह पकडलेला आरोपी व पोलीस कर्मचारी.

Web Title: One arrested with a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.