कांदा चोरीप्रकरणी मुद्देमालासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:22 IST2020-06-20T13:22:32+5:302020-06-20T13:22:42+5:30
नांदगाव : बाणगाव शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील ३० क्विंटल कांदा चोरी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमुळे मुद्देमालासह चोर रंगेहाथ सापडल्याची घटना घडली.

कांदा चोरीप्रकरणी मुद्देमालासह एकास अटक
नांदगाव : बाणगाव शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील ३० क्विंटल कांदा चोरी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमुळे मुद्देमालासह चोर रंगेहाथ सापडल्याची घटना घडली.
फिर्यादी चांगदेव प्रकाश घुले,रा बाणगांव यांनी तक्र ारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी राहुल बाळू कदम रा. हमालवाडा,याने फिर्यादीच्या शेतातून ५० किलो वजनाच्या उन्हाळ कांद्याच्या ६० गोण्या जितो महिंद्र (एम एच ४१/एजी १३४८) या मालवाहू गाडीत टाकून चोरल्या. कांद्याची किंमत बाजारभावाप्रमाणे १५ हजार रूपये आहे. कांदा टेम्पोतून उतरवण्याच्या आत सापडला. पोलिसांनी एकास अटक केली असून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण बोगीर तपास करत आहेत.