मालेगावी पिस्टलसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:53 IST2020-07-04T13:52:13+5:302020-07-04T13:53:10+5:30

मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र (पिस्टल) स्वत:च्या ताब्यात बाळगताना मिळून आला.

One arrested with Malegaon pistol | मालेगावी पिस्टलसह एकास अटक

मालेगावी पिस्टलसह एकास अटक

मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र (पिस्टल) स्वत:च्या ताब्यात बाळगताना मिळून आला. त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते यांनी काल शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास १५ हजार रुपये किंमतीचे पिस्टल बाळगताना ताब्यात घेतले.

Web Title: One arrested with Malegaon pistol

टॅग्स :Nashikनाशिक