दीडवर्षीय मुलाचा फास लागून मृत्यू
By Admin | Updated: August 11, 2015 23:51 IST2015-08-11T23:51:18+5:302015-08-11T23:51:43+5:30
दीडवर्षीय मुलाचा फास लागून मृत्यू

दीडवर्षीय मुलाचा फास लागून मृत्यू
नाशिक : मुलगा झोळीतून खाली पडू नये म्हणून झोळीला बांधण्यात आलेल्या स्कार्फचा फास लागून दीडवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिडकोतील रायगड चौकात मंगळवारी घडली़ मुलाचे नाव सार्थक सुनील पाटील आहे़
सिडकोतील रायगड चौकात सुनील पाटील हे कुटुंबासह राहतात़ त्यांचा दीडवर्षीय मुलगा सार्थक हा झोळीत झोपलेला होता, तो खाली पडू नये यासाठी या झोळीला स्कार्फ बांधण्यात आला होता़ या स्कार्फचाच गळ्याभोवती फास बसल्याने त्याचा श्वास गुदमरला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ खेरकर यांनी तपासून मयत घोषित केले़ (प्रतिनिधी)