शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

गुदाम फोडून दीड लाखांचा माल लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:42 IST

१लाख ४३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्युत खांबांवर ‘शॉर्टसर्किट’

नाशिक : अज्ञात चोरट्यांनी जुनेनाशिक परिसरातील नानावली येथील तिगरानिया रोडवर असलेले एक गुदाम फोडून सुमारे दीड लाख रूपयांचा माल लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजिद बालम शेख (रा. गणेशनगर, वडाळा) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार ते काम करत असलेल्या गुदामाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी गुदामात ठेवलेल्या पेस्टीज कुकर, पॅन, प्रेस्टिज डीलक्स ग्रेनाईट, ताडपत्री बंडल असा एकुण १लाख ४३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात कारणातून युवकाची आत्महत्त्यानाशिक : वडाळागावातील माळी गल्ली येथील सिध्द हनुमान मंदिरासमोर राहणारे कादीर शेख यांचा मुलगा मजहर शेख (२७) याने त्याच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत सिलिंग फॅनला वायर अडकवून गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर प्रकार त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. मझहर हा वायरिंगचे काम करत होता. त्याच्या आत्महत्त्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून त्याने आत्महत्त्या करण्यापुर्वी भींतीवर काही मजुकर लिहून ठेवल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार पठाण हे करीत आहेत.विद्युत खांबांवर ‘शॉर्टसर्किट’नाशिक : वडाळागावातील पिंगुळबाग येथील एका म्हशीच्या गोठ्याला लागून असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या खांबावर रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन भडका उडाला. विजवाहिन्यांमधून सुरूवातील ठिणग्या पडण्यास सुरूवात झाली असता. गोठ्याजवळ राहणाऱ्या कामगारांनी तत्काळ सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. क्षणार्धात संपुर्ण केबलने आग धरली आणि रात्रीच्या अंधारात या भडकलेल्या आगीच्या ज्वाला लांब अंतरावरून सहज दिसत होत्या. घटनेची माहिती रहिवाशांनी अग्निशमन मुख्यालयाला कळविली. माहिती मिळताच सिडको उपकेंद्रावरील बंबासह जवान घटनास्थळी काही मिनिटांत पोहचले; मात्र तोपर्यंत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील वीजपुरवठा तत्काळ खंडीत केल्याने आग विझली होती. या घटनेत कुठल्याहीप्रकारची हानी झाली नाही.-------

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीDeathमृत्यू