कोविशील्डचे दीड लाख डोस मागवणार, मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

By संजय पाठक | Published: March 18, 2021 09:24 PM2021-03-18T21:24:42+5:302021-03-18T21:27:34+5:30

नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसीकरणात अडचणी येऊ नये यासाठी आणखी २४ रूग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

One and a half lakh dose of Covishield will be ordered, informed Municipal Commissioner Kailas Jadhav | कोविशील्डचे दीड लाख डोस मागवणार, मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

कोविशील्डचे दीड लाख डोस मागवणार, मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना विरोधातील लढारविवारी लॅबची चाचणी

नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसीकरणात अडचणी येऊ नये यासाठी आणखी २४ रूग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या संदर्भात आयुक्त जाधव यांनी ही माहिती दिली.

प्रश्न- शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात अडचणी येत आहेत.
आयुक्त- होय. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन प्रकारचे डोस नाशिकमध्ये प्राप्त झाले आहेत मात्र, त्यातील कोविशिल्डचे डोस संपले आहेत. अगोदरच त्याची तयारी म्हणून दीड लाख डाेस मागवण्यात आले आहेत. ते शुक्रवारी प्राप्त होतील. त्यामुळे शनिवार रविवारी देखील लसीकरण करण्यात येईल. याशिवाय शहरात आणखी २४ खासगी रूग्णालयास लसीकरणाची सेाय करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रांवरील ताण कमी होईल.

प्रश्न- कोरेाना बाधीतांची संख्या वाढत असल्याने पुन्हा रूग्णालयांची गरज वाढु लागली आहे.
आयुक्त- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिकेची आणि खासगी रूग्णालये मिळून एकूण ३ हजार ६३६ बेडसची सेाय करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या १ हजार १०७ रूग्णच रूग्णालयात उपचार घेत असल्याने ८६ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. परंतु सध्या रूग्ण वाढीचा वेग बघितला तर कदाचित कोरोना केअर सेंटर्स सुरू करावे लागतील. त्या दृष्टीने नियोजन सुरू असून कंत्राटी पध्दतीने पाचशे आरोग्य- वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

प्रश्न- कोरोना चाचण्या वाढल्या तरी अहवाल खूप प्रलंबीत आहेत. महापालिकेची लॅब केव्हा सुरू होणार?
आयुक्त- महापालिकेची कोविड लॅब सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या रविवारी त्यात दोन नमुने तपासून तेच आयसीएमआर मध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर साधारणत: २५ मार्च पासून लॅब सुरू हेाईल. त्यामुळे अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाण कमी होईल.

Web Title: One and a half lakh dose of Covishield will be ordered, informed Municipal Commissioner Kailas Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.