त्र्यंबकेश्वरला दीड लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 00:56 IST2021-02-24T23:58:32+5:302021-02-25T00:56:58+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरातील रवींद्र वैद्य यांच्या वैद्य वाड्यातील घरामधील स्टोअर रूममधील कपाटाचे कुलूप तोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

त्र्यंबकेश्वरला दीड लाखाची घरफोडी
ठळक मुद्देफिर्याद राहुल रवींद्र वैद्य यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिली
त्र्यंबकेश्वर : शहरातील रवींद्र वैद्य यांच्या वैद्य वाड्यातील घरामधील स्टोअर रूममधील कपाटाचे कुलूप तोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
चोरट्याने कपाटातील पेशवाई घाटाचा व दीड किलो वजनाचा चांदीचा कलश, वासुदेव घाटाचा व अर्धा किलो वजनाचा चांदीचा पेला यासह लहान-मोठी चांदीची भांडी असा जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबतची फिर्याद राहुल रवींद्र वैद्य यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार खैरे तपास करीत आहेत.