मानोरी : परिसरातील महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.येवला तालुक्यातील महालखेडा येथे रविवारी भाऊसाहेब मनोहर भगत या शेतकऱ्याच्या दीड एकर उसाला अचानक आग लागली. यात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ जवळील पाण्याच्या मोटरी सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझेपर्यंत ५० टक्के ऊस जळून खाक झाला होता. येवला तालुक्यात आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अद्याप हिवाळा असूनसुद्धा आग लागल्याच्या घटना वाढत असल्याची माहिती येवला अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
महालखेड्यात दीड एकर ऊस भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:19 IST
मानोरी : परिसरातील महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.
महालखेड्यात दीड एकर ऊस भस्मसात
ठळक मुद्देजवळील पाण्याच्या मोटरी सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न