एक एकर द्राक्षबाग तोडून केली भाजीपाल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:26 IST2020-06-19T22:32:17+5:302020-06-20T00:26:10+5:30

गत द्राक्ष हंगामात कोणताच हमीभाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्राधान्य देत भरघोस आर्थिक उत्पन्न मिळविले अहे.

One acre vineyard was cut down and vegetable farming was done | एक एकर द्राक्षबाग तोडून केली भाजीपाल्याची शेती

एक एकर द्राक्षबाग तोडून केली भाजीपाल्याची शेती

ठळक मुद्देलखमापूर : भरघोस आर्थिक उत्पन्न; द्राक्ष पिकाला दर मिळत नसल्याने बळीराजाचा प्रयोग

लखमापूर : गत द्राक्ष हंगामात कोणताच हमीभाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्राधान्य देत भरघोस आर्थिक उत्पन्न मिळविले अहे.
दिंडोरी तालुक्यातील खतवड हे द्राक्ष पिकविणाºया गावांमधील एक महत्त्वाचे गाव समजले जाते, परंतु दिवसेंदिवस द्राक्ष शेती करणे फार अवघड होत चालले आहे. महागड्या औषधांचा वापर करून द्राक्ष पीक घेतले जाते. जेवढे उत्पन्न त्यातले ३० ते ३५ टक्के भांडवल अगोदर खर्च करावे लागते. नंतर हातात पैसा हे गणित द्राक्षे हंगामाचे राहते. त्यामुळे खूप मेहनत, भरपूर भांडवल, मनुष्य बळ हे सर्व करूनही घेतलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही, म्हणून शेतकरीवर्ग नाराज होत चालला आहे.
या संकटांना न घाबरता प्रयोगशील शेतकरी गोकुळ महाराज खुर्दळ यांनी नवीन प्रयोग करीत एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून, त्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचा प्रयोग करून संकटातून बाहेर पडण्यासाठी भाजीपाला शेतीचा मार्ग शोधला आहे.
गोकुळ महाराज खुर्दळ हे सध्या देहू येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून, संत सावता महाराज यांच्या ‘कांदा, मुळा, भाजी... अवघी विठाई माझी’ या अंभगाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या शेतात द्राक्ष पिकांची झाडे काढून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीचा वापर करीत भाजीपाला शेती करण्यास सुरु वात केली आहे. भाजीपाला शेती चांगली येत असल्याने आणि योग्य दर मिळण्यास चांगली मदत होत आहे.

मागील तीन वर्षांपासून आम्हाला द्राक्ष पिकाला खूप मेहनत करूनही योग्य दर मिळत नव्हता. कर्ज मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही शेतीमध्ये बदल करण्याचे ठरविले व द्राक्षबागा तोडून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीची भाजीपाला शेती सुरू केली, आम्हाला त्यामध्ये यश मिळत आहे. - गोकुळ महाराज खुर्दळ, खतवड

Web Title: One acre vineyard was cut down and vegetable farming was done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.