अपोलोत कॅन्सर रुग्णांसाठी ऑन्कोलॉजिस्ट्स सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:14+5:302021-02-05T05:46:14+5:30

नाशिक : नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक दर्जाच्या ऑन्कोलॉजिस्ट्स तज्ज्ञांची सेवा नाशिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी ...

Oncologists Service for Apollo Cancer Patients | अपोलोत कॅन्सर रुग्णांसाठी ऑन्कोलॉजिस्ट्स सेवा

अपोलोत कॅन्सर रुग्णांसाठी ऑन्कोलॉजिस्ट्स सेवा

नाशिक : नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक दर्जाच्या ऑन्कोलॉजिस्ट्स तज्ज्ञांची सेवा नाशिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवी मुंबई येथील अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये विविध प्रकारची निदाने, तंत्रज्ञाने आणि उपचारांमधील तज्ज्ञांची जागतिक पातळीवर नावाजली जाणारी टीम एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. सर्जिकल आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजीबरोबरच पश्चिम भारतातील सर्वाधिक अत्याधुनिक रेडिएशन ऑन्कोलॉजी तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध आहे. यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड संतोष मराठे यांनी, शरीराच्या ज्या अवयवाला कर्करोग झाला आहे त्यानुसार विशिष्ट उपचार आणि काळजी यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सना नावाजले जात असल्याचे सांगितले. तसेच नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याचेही नमूद केले. आम्ही नाशिकमधील रुग्णांना आवाहन करतो की, त्यांनी सेकंड ओपिनियन सेवांमार्फत या स्पेशलिस्ट्सच्या सेवांचा लाभ घ्यावा, ज्यामुळे कर्करोगावर नेमके उपचार मिळवण्यात आणि उपचारांचे अधिक चांगले परिणाम घडून येण्यास मदत होईल. अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे सीईओ डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी अपोलो हॉस्पिटल्स नाशिकमध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करतो, असे सांगितले.

Web Title: Oncologists Service for Apollo Cancer Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.