गंगापूररोडवर ओम्नी कारने अचानक घेतला पेट
By Admin | Updated: October 14, 2016 00:24 IST2016-10-14T00:21:52+5:302016-10-14T00:24:52+5:30
गंगापूररोडवर ओम्नी कारने अचानक घेतला पेट

गंगापूररोडवर ओम्नी कारने अचानक घेतला पेट
नाशिक : जेहान सर्कलकडून अशोकस्तंभकडे जाणाऱ्या मारुती ओम्नीने (एमएच १५, बीडी १०९७) येथील उड्डाणपुलाजवळ अचानक पेट घेतला. सदर घटना संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
वाहनाने पेट घेतल्याचे बघून वाहनचालक व त्याच्या मित्राने तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निरोधक यंत्राच्या साहाय्याने पेटलेले वाहन तत्काळ विझविले. यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच मुख्यालयातील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचला; मात्र तोपर्यंत वाहनाची आग विझलेली होती. जवानांनी वाहनाची पाहणी क रून मागील बाजूस बसविलेल्या गॅसकिटचीही पाहणी केली.